शक्ती देणार दूध (Rules Of Drinking Milk)

शक्ती देणार दूध (Rules Of Drinking Milk)

दूध आपल्या आहारातील एक प्रमुख घटक आहे.  आपल्या शरीर आणि बुद्धीला आवश्यक पोषणमूल्ये दुधातून मिळतात. थंड, वात आणि पित्त दोषाला संतुलित करण्याचं काम दूध करतं. आयुर्वेदानुसार गायीचे दूध जास्त पौष्टिक असतं. दुधाने भूक लागत नाही. लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. परंतु काही लोकांना दूध प्यायल्यानंतर पचत नाही. त्यांना पोट फुगण्याची किंवा वारंवार खराब होण्याची समस्या निर्माण होते. जर एखाद्याची पचनशक्ती कमी असल्यास त्यांना दूध पचत नाही. आयुर्वेदामध्ये दूध पिण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास दूध पचेल आणि आरोग्यास लाभ होईल.

साखर न मिसळलेलं दूध
सामान्यतः लोक दुधात साखर टाकून ते दूध पितात. आयुर्वेदानुसार रात्री साखर न टाकता दूध पिणे अधिक फायदेशीर राहील. शक्य असल्यास दुधामध्ये गायीचे एक किंवा दोन चमचे तूप टाकू शकता.
ताजे आणि जैविक दूध
सध्याच्या काळात आपली जीवनशैली अशी आहे की, आपण प्रत्येक वस्तू पॅकिंगमधील वापरतो. अनेक लोक पॅकिंगमधील दूध वापरतात. पॅकिंगमधील दूध ताजे नसते आणि जैविकही नसते. आयुर्वेदानुसार ताजे, जैविक आणि रासायनिक प्रक्रिया न केलेले दूध उत्तम असते. पॅकिंगमधील दुधाचे सेवन करू नये.
उकळलेले दूध
काही लोकांना कच्चं दूध पिणं आवडतं. फ्रीजमधून दूध काढून न उकळता तसेच पिणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जात नाही. आयुर्वेदानुसार दूध उकळून, गरम असताना प्यावे. दूध पिताना जड वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिसळू शकता. असं दूध सहजपणे पचते.
देशी गायीचं दूध
आयुर्वेदात गायीच्या दुधाचं सेवन करण्यावर जास्त भर असतो. आयुर्वेदानुसार देशी गायीचं दूधच सर्वात जास्त आरोग्यदायी आहे.
लवंग आणि वेलची
ज्या लोकांना दूध पचत नाही त्यांच्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे, दुधामध्ये चिमूटभर आलं, लवंग, वेलची, केशर, दालचिनी आणि जायफळ इत्यादी सामग्री मिसळावी. यामुळे तुमच्या पोटातील अतिरिक्त उष्णता वाढेल आणि यांच्या मदतीनं दूध पचण्यास मदत होईल.
दूध आणि केशर
अनेकदा कामाच्या गडबडीमुळे रात्री आपण जेवण करत नाही. आयुर्वेदानुसार अशा वेळी दुधामध्ये चिमूटभर जायफळ आणि केशर टाकून हे दूध प्यावं. यामुळे झोपही चांगली लागते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा प्राप्त होते.