रूबीना दिलैक बनली ‘बिग बॉस १४’ ची विनर, तिच्या ...

रूबीना दिलैक बनली ‘बिग बॉस १४’ ची विनर, तिच्या आधी ही ट्रॉफी जिंकलेल्या टेलिव्हिजनवरील या ५ सूना (Rubina Dilaik wins ‘Bigg Boss 14’, Before Her These Television Daughter In Laws have Also Won This Trophy)

‘बिग बॉस १४’ सुरु झाल्यापासूनच सर्वांची आवडती राहिलेली छोटी बहू अर्थात रुबीना दिलैकने आपल्या सर्व प्रतिस्पर्धकांना मागे टाकत ‘बिग बॉस १४’ ची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. यामुळे प्रेक्षकांचेही अंदाज खरे ठरले आहेत. रुबीनाने अतिशय हुशारीने सर्व खेळ खेळत रनर अप राहुल वैद्य यास मात देऊन ही ट्रॉफी जिंकली आहे. ही ट्रॉफी जिंकणारी रुबीना ही सहावी टेलिव्हिजन कलाकार आहे.

आत्तापर्यंत ‘बिग बॉस’ या शोचे १४ सीझन झाले आहेत आणि आत्तापर्यंत शोच्या विजेत्यांमध्ये टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय सूनांनी बाजी मारलेली आहे. रुबीना दिलैक, श्वेता तिवारी पासून ते उवर्शी ढोलकिया, जूही परमार तसेच शिल्पा शिंदे पर्यंत… या सूनांनी बिग बॉसची ट्रॉफी जिंकलेली आहे. पाहुया रुबीनाच्या आधी टेलिव्हिजनवरील कोणकोणत्या अभिनेत्रींनी ही ट्रॉफी जिंकली आहे?

श्वेता तिवारी (बिग बॉस ४)

‘कसौटी जिंदगी की’ फेम श्वेता तिवारी ने चौथ्या सीझनमध्ये खूप धमाल केली होती. खरं तर या सीझनमध्ये डॉली बिंद्राचा राग आणि घरात तिच्यामुळे होणारी भांडणं सर्वाधिक चर्चिली गेली होती… या सीझनमध्ये फारच अटतिटीची स्पर्धा होती, परंतु आपल्या चाहत्यांच्या विश्वासामुळे श्वेता तिवारी ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरली.

जूही परमार (बिग बॉस ५)

श्वेता तिवारीने ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर लगेचच ‘बिग बॉस ५’ च्या सीझनमध्ये लोकप्रिय सून जूही परमार ‘बिग बॉस ५’ ची अंतिम विजेती ठरली. जुहीला त्यावेळेस ट्रॉफीसोबतच १ करोडचे बक्षिसही मिळाले होते.

उवर्शी ढोलकिया (बिग बॉस ६)

कोमोलिका म्हणून कायम आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली उवर्शी ढोलकियाने ‘बिग बॉस ६’ ची ट्रॉफी जिंकून ही साखळी चालू ठेवली. उवर्शीने बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यापासूनच आपलं कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली होती आणि त्यामुळे शेवटपर्यंत आपल्या सगळ्या प्रतिस्पर्धकांना मागे टाकत तिने ‘बिग बॉस ६’ च्या विजयावर आपली मोहर उमटवली.

शिल्पा शिंदे (बिग बॉस ११)

‘भाभी जी घर पर हैं’ या शोमधील अंगूरी भाभी अर्थात शिल्पा शिंदेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. त्यामुळे बिग बॉसमध्ये प्रवेश झाल्यानंतरही शिल्पाला आपल्या चाहत्यांकडून खूपच पसंती दर्शवली गेली. बिग बॉसच्या घरामध्ये लोकांना शिल्पाचं खरं रुप पाहता आलं. खऱ्या जीवनातील शिल्पा पाहताना प्रेक्षकांना ती इतकी आवडली की विकास गुप्ता सारख्या स्ट्राँग स्पर्धकाला हरवून शिल्पा ‘बिग बॉस ११’ची विजेती झाली.

दीपिका कक्कड (बिग बॉस १२)

‘ससुराल सिमर का’ फेम टिव्हीवरील आणखी एक आवडती सून दीपिका कक्कडने ‘बिग बॉस १२’ या सीझनची ट्रॉफी पटकावली. दीपिकाने बिग बॉसच्या या १२ व्या सीझनमध्ये जरी भाग घेतलेला असला तरी या सीझनचा आवडता स्पर्धक श्रीसंत होता आणि सुरभिने श्रीसंतला टार्गेट केलेले प्रेक्षकांना आवडले होते; तरीही दीपिका सर्व स्पर्धकांमध्ये अधिक समजूतदार आणि भावूक स्पर्धक ठरली. तिच्या या स्वभावानेच तिला यशस्वी बनवले.