पाहा पर्पल ऑफ शोल्डर गाउनमध्ये अभिनेत्री रुबिना...

पाहा पर्पल ऑफ शोल्डर गाउनमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैकच्या दिलखेचक अदा (Rubina Dilaik Stunningly Poses In A Light Purple Off Shoulder Gown, See Dreamy Pictures)

अभिनेत्री रुबिना दिलैक खूप स्टायलिश आहे. तिच्या स्टाईल सेन्ससाठी तिचे सोशल मीडियावर खूप कौतुक होते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने फिकट जांभळ्या ऑफ शोल्डर गाउनमधले फोटो पोस्ट केले होते, त्यात ती अतिशय सुंदर दिसत होती.

रुबिनाचा हा गाऊन तिच्यासारखाच खूप सुंदर आहे आणि त्यामुळेच चाहत्यांचे लक्ष वेधले जात आहेत. या गाऊनमध्ये ती अगदी रॉयल दिसत आहे.

रुबिनाचा मेकअपही तिच्या लूकला पूरक आहे. तिने आपले केस घट्ट अंबाड्यात बांधले आहेत, ओठांवर गडद लिप कलर लावला आहे आणि डोळ्यांवर हलका मेकअप केला आहे ज्यामुळे तिला एक परफेक्ट लूक मिळालेला पाहायला मिळतो.

हा लूक पाहून चाहत्यांना तिचा बिग बॉस सीझन आठवला, कारण बिग बॉसच्या घरातही अभिनेत्रीने जांभळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. चाहते तिला मिस परफेक्ट म्हणत आहेत. रुबिनाने खूप किलर पोज देखील दिल्या आहेत, ती खूपच आकर्षक दिसत आहे. तिच्या गाऊनमुळे तिला बार्बी डॉलचा लूक आला आहे.