स्टायलिश पिवळ्या गाऊनमध्ये रूबिना दिलैकने पेश क...

स्टायलिश पिवळ्या गाऊनमध्ये रूबिना दिलैकने पेश केले चित्ताकर्षक फोटो : तिची अदा पाहून चाहते झाले खुश (Rubina Dilaik Shares Stunning Pics In Royal Yellow Gown)

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती रुबिना दिलैक सोशल मीडियावर सतत सक्रीय राहून आपल्या चाहत्यांसोबत तिचे फोटो आणि व्हिडिओज्‌ शेअर करत राहते. सोशल मीडियावर तिचा भला मोठा चाहतावर्ग आहे, जो तिच्या प्रत्येक पोस्टला पसंती दर्शविताना दिसतो.

यावेळेस रुबिनाने बऱ्याच दिवसांनी सुंदर फोटोशूट करून घेतलं आहे. रुबिनाचे हेच चित्ताकर्षक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये स्टायलिश पिवळ्या गाऊनमधील रुबिनाचे सौंदर्य मनमोहक दिसत आहे.

फ्रिल फ्रिलची डिझाइन असलेल्या नियॉनच्या या पिवळ्या गाऊनमध्ये ती सुंदर राजकुमारीच दिसते आहे. आपल्या केसांचा पोनी बांधून तिने आपलं लूक कम्प्लिट केलं आहे. मेकअपबद्दल बोलायचे तर तिने या लुकसाठी हेवी मेकअप लूक निवडला आहे. गुलाबी ओठ, केशरी आणि गुलाबी आय-शॅडोमध्ये ती आकर्षक दिसतेय. कानात हुप्स घालून रुबिनाने जबरदस्त पोज दिली आहे.

रुबिनाने नुकतेच हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “तुम्ही पाहत असलेली स्वप्ने पूर्ण करण्यास कधीही उशीर झालेला नसतो.. त्यामुळे मी नवीन वर्षात पाऊल टाकत आहे. ६ दिवसांनी.” तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत त्यास तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

याआधीही रुबिनाने अनेकवेळा ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत. बिग बॉसच्या रिअॅलिटी शोमध्येही तिच्या वेगळ्या लूकमुळे चाहत्यांनी तिला खूप पसंती दिली होती.

सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम