रूबीना दिलैकने आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या शूट...

रूबीना दिलैकने आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये केले नखरे, आपली मागणी पूर्ण करण्याचा हट्ट धरून बसली… (Rubina Dilaik Refuses To Shoot Her Debut Film For This Silly Reason? Actress Reacts)

आधी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री म्हणून सुप्रसिद्ध असलेली बॉस लेडी रुबीना दिलैक, बिग बॉस जिंकल्यापासून अधिकच लोकप्रिय झाली आहे. आता रुबीना ‘अर्ध’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती हितेनसोबत दिसणार आहे. परंतु या दरम्यान, चित्रपटाच्या सेटवरून अशी बातमी कळली की, रुबीना आपली मागणी पूर्ण करण्याचा हट्ट धरून ४५ मिनिटं तिच्या कारमध्येच बसून राहिली, बाहेरच आली नाही.

Rubina Dilaik, Debut Film

टाईम्सच्या रिपोर्टनुसार, रुबीनाने डबल डोअर व्हॅनिटी व्हॅनची मागणी केली; जेणेकरून तिचे कर्मचारीही तिच्यासोबत राहू शकतील. रुबिनासाठी सिंगल डोअरची व्हॅनिटी मागवण्यात आली होती पण तिने डबल डोअरची मागणी केली आणि आपली मागणी पूर्ण होईपर्यंत ती तिच्या गाडीतून उतरली नाही. सिंगल डोअर व्हॅनिटी परत पाठवत, त्यांच्यासाठी डबल डोअर व्हॅनिटी मागवण्यात आली. रुबीना ८ वाजताच शूटिंगसाठी आली होती पण डबल डोअरची व्हॅनिटी येईपर्यंत ती कारमध्ये बसून शूटिंग थांबवून राहिली आणि ८.४५ वाजता डबल डोअर व्हॅनिटी आल्यावर ती बाहेर आली.

Rubina Dilaik, Debut Film

चित्रपट सुरू झाल्यापासून रुबीनाचे नखरे वाढत असल्याच्या बातम्या वरचेवर येत असतात. रुबिनाला याबद्दल विचारल्यावर ती हसत हसत म्हणाली की, ही बातमी अधिक मनोरंजक बनवण्यासाठी, हेही जोडा की रुबीनाला शूटिंगचे लोकेशन पसंत नाही, कारण तो एरिया झोपडपट्टीचा आहे आणि रुबीना शूटिंग सोडून सेटवरून निघून गेली.

Rubina Dilaik, Debut Film

टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, वेळ वाया जाऊ नये म्हणून शूटमध्ये अशा प्रकारे सुधारणा करावी लागली. शूटिंग दरम्यान फक्त काही सीन आणि फोटो सेशन करता आले. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईच्या मोहम्मद अली स्टुडिओ मालवणीमध्ये सुरू आहे आणि हितेन तेजवानी रुबीनासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

रुबिनाच्या नखऱ्यांबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक पलाश मुच्छल यांना विचारले असता, त्यांनी रुबीनाचा बचाव करत ती व्हॅनिटीच्या कारणामुळे नाही तर बाहेरच्या पावसामुळे कारमधून उतरली नाही, असे सांगितले. पलाशचा दिग्दर्शक म्हणूनही हा पहिलाच चित्रपट आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम (सर्व फोटो)