रूबिना दिलैकच्या निळ्या बिकिनीतील भन्नाट फोटोंन...

रूबिना दिलैकच्या निळ्या बिकिनीतील भन्नाट फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले (Rubina Dilaik Goes All Bold In Blue Bikini, Sets The Internet on Fire)

लेडी बॉस रुबिना दिलैक आता हॉटनेस क्वीन बनली आहे. आपण आता इंटरनेटचे तापमान वाढवणारच, अशा निग्रहाने तिनं इन्स्टाग्रामवर ब्लू बिकिनी घालून असे भन्नाट फोटो टाकले आहेत की हॉटनेस क्वीन म्हणणे भाग आहे.
या फोटोमध्ये ती हा तोकडा पोहण्याचा पोशाख घालून स्विमींग पूलमध्ये उतरताना दिसते आहे. अन्‌ फारच सुंदर दिसते आहे. या पोशाखात तिची फिट फिगर पाहून चाहत्यांची शुद्ध हरपली असल्यास नवल नाही. म्हणूनच या फोटोवर ते फिदा होऊन आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी तिला हॉटनेस क्वीन म्हणत आहे, तर आमचा फोन ब्लास्ट होईल, अशीही टोकाची प्रतिक्रिया कोणी दिली आहे,

” मी फक्त सुट्टी घेण्यासाठी आतुर आहे, फक्त बीच, बिकिनी आणि त्याचे फोटो हेच मला आत्ता हवे आहे.” अशी प्रतिक्रिया रुबिनाने या फोटोवर दिली आहे. अन्‌ त्याचे श्रेय आपला नवरा अभिनव शुक्लास दिले आहे. त्यानेच हा फोटो काढला आहे

बिग बॉसची स्पर्धा जिंकल्यावर रुबिना आता ‘शक्ती अस्तित्त्व के अहसास’ मध्ये दिसत आहे. आपल्या स्टाईलवरून ती नेहमीच चर्चेत राहते.

अलिकडेच तिनं रिप्ड जिन्स घातलेले फोटो प्रदर्शित केले होते. त्यावर चांगले कमेंटस्‌ आले होते. टी. व्ही. शो मध्ये ती जास्त करून पारंपरिक पोशाखात दिसते. त्यामुळे तिच्या बिनधास्त ग्लॅमरस्‌ छायाचित्रांची चाहते वाट पाहत असतात.

सर्व फोटो – सौजन्य इन्स्टाग्राम