बिकीनीमुळे ट्रोल झाली रूबिना दिलैक, लोक म्हणाले...

बिकीनीमुळे ट्रोल झाली रूबिना दिलैक, लोक म्हणाले शोभत नसेल तर घालते कशाला..(Rubina Dilaik Gets Fat-Shamed For Sharing A Video In Bikini, Users Say- When You Don’t Have A Bikini Body, Why To Flaunt)

अभिनेत्री रूबिना दिलैकचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. ती सोशल मीडियावर सुद्धा खूप अॅक्टिव्ह असते. रुबिनाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्या फोटोत तिने बिकीनी परिधान केली आहे.

रुबिना पती अभिनव शुक्लासोबत नदीत पोज देताना दिसत आहे. रुबिनाने वन शोल्डर गुलाबी आणि हिरव्या रंगाची प्रिंटेड बिकिनी घातली असून ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे चाहते तिला हॉट आणि मोस्ट ब्युटीफुल अशी कमेंट करत आहेत.

पण काहीजण मात्र या फोटोंवरुन तिला खूप ट्रोलही करत आहेत. या फोटोंमुळे रुबिना फॅट शेमिंगची शिकार झाली आहे. काहींनी कमेंट करत खूप जाड झाली आहे, फक्त चेहरा सुंदर दिसतो शरीर नाही, बिकीनी योग्य शरीर नाही तर मग ती घातली कशाला, सेक्सी फिगर नसताना कशाला असे घालायचे असे म्हटले आहे.

पण रुबिनाने यावर म्हटले की ती आता स्वतःवर प्रेम करायला शिकली आहे आणि तिचे आरोग्य सर्वांत महत्त्वाचे आहे. बिग बॉस 14 जिंकल्यानंतर, आता रूबी खतरों के खिलाडी 12 मध्ये दिसत आहे.