‘सांग तू आहेस का’ मध्ये राजेशाही लग...

‘सांग तू आहेस का’ मध्ये राजेशाही लग्नाचा थाटमाट (Royal Wedding In Marathi Serial)

‘सांग तू आहेस का’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत लवकरच स्वराज आणि कृतिकाच्या लग्नाची धामधूम बघायला मिळणार आहे.

हे लग्न राजेशाही थाटात होणार असून वधू-वरांचे कपडे आणि दागदागिने यांचा थाटमाट दिसणार आहे. नायक-नायिकेच्या या राजेशाही लग्नासाठी त्यांचा खास लूक डिझाइन करण्यात आला आहे. पारंपरिक नऊवारी साडीतील कृतिका आणि डिझायनर शेरवानी परिधान केलेला स्वराज यांचा लूक लक्षवेधी ठरेल.

छोट्या पडद्यावरील आजवरच्या लग्नसमारंभात हा लूक रॉयल आणि हटके आहे.

लग्नाची ही धामधूम थोडीशी कलाटणी देणारी ठरणार आहे. कारण या लग्नात मोठा ट्विस्ट दडलेला आहे. सुलू ही खलनायिका डॉ. वैभवीला स्वराज पासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या लग्नात तर तिने वैभवीला जीवे मारण्याचा घाट घातला आहे. आता ती यशस्वी होते की नाही, ही गोष्टीतली कलाटणी आहे.

चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा