आपली पत्नी नीलमच्या वाढदिवशी रोनित रॉय झाला बेफ...

आपली पत्नी नीलमच्या वाढदिवशी रोनित रॉय झाला बेफाम : आवेगाने चुंबन घेत असलेला फोटो प्रसिद्ध केला.(Ronit Roy Wishes Birthday To His Wife Neelam With A Hot Liplock : Shares Romantic Pics)

रोनित रॉय, म्हणजे टी.व्ही. वरील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार, आणि ‘कसौटी जिंदगी की’ या कार्यक्रमाचा हॉट मिस्टर बजाज, आपल्या खासगी जीवनात फारच हॉट आणि रोमॅन्टिक आहे. त्याचा पुरावा आहेत, ही छायाचित्रे. आपली प्रिय पत्नी नीलम सिंह हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर प्रसिध्द केले आहेत.

 रोनितने आपल्या पत्नीला अतिशय रोमॅन्टिक पध्दतीने शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं आवेगाने चुंबन घेतल्याचा फोटो प्रसिध्द केला. सोबत त्याने आणखी जे फोटो टाकले आहेत, तेही अतिशय रोमॅन्टिक आहेत.

ओठांचे चुंबन घेतल्यावर रोनित, नीलमच्या हाताचे चुंबन घेताना दिसतो आहे. तर आणखी एका छयाचित्रात त्याने तिला मागून मिठी मारली आहे. अन डोळे बंद करून नीलमने  आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकले आहे.

नीलमने देखील हॉट वन शोल्डर ब्लॅक गाऊन घातला आहे. त्यात ती फारच बोल्ड दिसते आहे.

रोनितच्या चाहत्यांना ही छायाचित्रे चांगलीच आवडली आहेत. रोनितची ही रोमॅन्टिक कृती पहिलीच नव्हे, यापूर्वी त्याने आपल्या पत्नीशी चुंबाचुंबी करत असल्याचे फोटो प्रसिध्द केले होते.
Photo Courtesy: Instagram (All Photos)