दारु आणि सिगरेट म्हणजे काय या मुलांच्या प्रश्ना...

दारु आणि सिगरेट म्हणजे काय या मुलांच्या प्रश्नावर रितेश आणि जिनेलियाने असे दिले होते उत्तर (Ritesh And Genelia Deshmukh Replied To Children’s Queries About cigarette And Alcohol)

बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनेलिया देशमुख हे दोघेही सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांचा वेड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात तर जिनेलियाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दोघांनीही बऱ्याच ठिकाणी हेजरी लावली. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. त्यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गोष्टींचा खुलासा केला.

रितेश आणि जिनेलिया यांना रियान आणि राहिल ही दोन मुलं आहेत. त्यांची मुलं नेहमीच कॅमेऱ्यासमोर आल्यावर नम्रपणे हात जोडून उभे राहतात. त्यामुळे चाहत्यांमध्ये नेहमीच त्यांचे कौतुक होत असते. मुलं म्हटलं की प्रश्नांचा भांडार हा येतोच. रितेश आणि जिनेलियाची मुलंही त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारुन भांडावून सोडतात असे त्यांनी मुलाखतीत सांगितले. चित्रपट करत असताना त्याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होईल याचा तुम्ही विचार करता का असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला. त्यावेळी रितेशने एकदम छान उत्तर दिले.

तो म्हणाला,  “या चित्रपटामधील माझा लूक पाहून माझ्या मुलांनी मला विचारलं की तुमच्या तोंडामध्ये काय आहे? सिगरेट म्हणजे काय?. आम्ही लोकांच्या तोंडामध्ये हे पाहिलं आहे अशी माझी मुलं मला म्हणाली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आपण हे काही करत नाही. शिवाय आम्ही दोघंही सिगरेट व दारू पीत नाही. त्यांनी एखादा प्रश्न विचारल्यावर आम्ही त्यांना खरे उत्तर देतो. ” शिवाय रितेशच्या या उत्तरातून ते निर्व्यसनी असल्याचे स्पष्ट झाले. रितेश आणि जिनेलियाच्या संस्कारांचे चाहत्यांमध्ये नेहमीच कौतुक होत असते.