अभिनेत्री जिनेलिया देशमुखचा हा सुपरस्टार आहे क्...

अभिनेत्री जिनेलिया देशमुखचा हा सुपरस्टार आहे क्रश (Riteish Deshmukh’s Wife Genelia Has A Crush On This Superstar)

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता रितेश देशमुखची पत्नी जिनेलिया डिसूझा ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या जिनेलिया आणि रितेश त्यांच्या आगामी ‘वेड’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये पूर्णपणे व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे जोडपे हिंदी बिग बॉसच्या घरात गेले होते, तिथे त्यांनी घरातील सदस्य आणि शोचा सूत्रसंचालक सलमान खानसोबत खूप मजा केली. यादरम्यान रितेशने जिनेलिया बाबत अनेक खुलासेही केले.

20 वर्षांनंतर रितेश आणि जिनेलिया दोघेही चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. रितेश आणि जिनेलिया ची जोडी सर्वांनाच आवडते. जेव्हा बिग बॉसच्या घरात रितेश आणि जिनेलिया  एकमेकांबद्दल सांगत होते, त्याचवेळी रितेशने सांगितले की जिनेलियाचा सलमान खानवर खूप क्रश आहे. तिला तो खूप आवडतो.

जिनेलिया डिसूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, अभिनेत्रीचे विनोदी रील्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

जिनेलिया डिसूजाचे कौतुक करताना रितेश देशमुखने ती एक मल्टी टास्कर असल्याचे सांगितले. ती एकाच वेळी अनेक गोष्टी करते. त्यावेळी सलमान खानही जिनेलियाचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. तो म्हणाला की जिनेलिया 20 वर्षांपूर्वी जशी दिसत होती तशीच आताही दिसते.

जिनेलिया आणि रितेश देशमुख यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचे तर, दोघांची पहिली भेट ‘मुझे तेरी कसम’ या चित्रपटाच्या टेस्ट शूटदरम्यान झाली होती. सुरुवातीला, जिनेलियाने रितेशकडे तो मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने त्याच्यात अहंकार असेल आणि तो खूप बिघडलेला असेल असा विचार करुन दुर्लक्ष केले.

पण नंतर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि डेट करू लागले. दोघांनी जवळपास 8 वर्षे एकमेकांना डेट केले होते. नंतर 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांनी लग्न केले. आता त्यांना दोन मुले आहेत.