ऋषि कपूर यांचा शेवटचा सिनेमा ‘शर्माजी नमकीन’ लव...

ऋषि कपूर यांचा शेवटचा सिनेमा ‘शर्माजी नमकीन’ लवकरच ओटीटीवर प्रदर्शित… (Rishi Kapoor’s Last Film ‘Sharmaji Namkeen’ Is All Set For OTT Release)

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल २०२० रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती. ऋषी कपूर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचे चित्रपट लोक आजही आवडीनं पाहतात. आता लवकरच ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ‘शर्माजी नमकीन’ ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ऋषी कपूर यांनी या चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग पूर्ण केले होते. पण त्यांचे निधन झाल्यानंतर परेश रावल यांनी ऋषीजींनी साकारलेले समान पात्र साकारण्याचे संवेदनशील पाऊल उचलण्याचे मान्य करून चित्रपट पूर्ण केला आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि मॅकगफिन पिक्चर्स निर्मित, नवोदित हितेश भाटिया दिग्दर्शित, हा चित्रपट ६० वर्षांच्या एका प्रेमळ व्यक्तीची कथा सांगतो.

या चित्रपटात परेश रावल आणि ऋषी कपूर हे दोन्ही कलाकार एकच भूमिका साकारताना दिसणार आहेत. तसेच ऋषी कपूर, परेश रावल यांच्यासोबतच जूही चावला, सोहेल नैय्यर, तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चड्ढा आणि ईशा तलवार हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

हा चित्रपट ३१ मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)