रिक्षावाली अंतरा आता मॉडर्न अवतारात (Rickshaw D...

रिक्षावाली अंतरा आता मॉडर्न अवतारात (Rickshaw Driver Antara Gets A Modern Look In ‘Jeev Maza Guntala’)

कलर्स मराठी चॅनलवर ‘जीव माझा गुंतला’ ही कोल्हापुरी बाज असलेली मालिका आहे. मालिकेची नायिका अंतरा हिच्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने ती ऑटोरिक्षा चालवत होती. ऑटोरिक्षा चालवणारी ड्रायव्हर म्हणून एक तरुण नायिका, हे या मालिकेचं वैशिष्ट्य ठरलं होतं.

नायिकेचं हे वेगळं रूप योगिता चव्हाण साकार करते आहे. तिचा आपल्या रिक्षावर एवढा जीव आहे की, तिची खूप काळजी घेते, तिच्याशी बोलते, असं दाखवण्यात आलं होतं. या मालिकेच्या कथानकात पुढे अंतरा व मल्हार यांची गोड प्रेमकथा जोडण्यात आली.

अशा या प्रेमकथेत आता कलाटणी देणाऱ्या घटना घडत आहेत. अंतरा-मल्हार लग्नाच्या बंधनात अडकले. अन्‌ आता अंतरा मॉडर्न अवतारात दिसणार आहे. तिचे वेस्टर्न स्टाईलचे कपडे, अजब इंग्लिश बोलणे आणि हाय हिल्स घालून उडणारी तिची तारांबळ, यामुळे मालिका मजेशीर झाली आहे.

आधी सोज्वळ रुपात दिसणारी आता मॉडर्न अवतारात आकर्षक दिसत आहे.