सोनम कपूरच्या बाळाची पहिली झलक आली समोर, मावशी ...

सोनम कपूरच्या बाळाची पहिली झलक आली समोर, मावशी रिया कपूरने शेअर केले फोटो (Rhea Kapoor Shares First Glimpse of Sonam Kapoor’s New Born Baby Boy)

शनिवारचा दिवस बॉलिवू़ड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजासाठी त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होता. शनिवारी सोनम आणि आनंदने आपल्या बाळाचे या जगात स्वागत केले. शिवाय आजी आजोबा झाल्यामुळे अनिल कपूर आणि सुनिता कपूर यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अशातच सोनमच्या नवजात बाळाची पहिली झलक समोर आली आहे. नुकतीच मावशी झालेल्या रिया कपूरने आपल्या भाच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रियाने सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सोनमच्या बाळाचे फोटो शेअर केले. हे फोटो हॉस्पिटलमधले आहेत. या फोटोत रिया कपूर आपली आई सुनिता कपूरसोबत भाच्याला भरल्या डोळ्यांनी पाहत आहे. रियाने हे फोटो शेअर करताना बाळाचा चेहरा दाखवणे कटाक्षाने टाळले. तिने बाळाच्या चेहऱ्यावर इमोजी लावला आहे.

या फोटोसोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, रिया मावशी ठिक नाही. निरागसता खूप आहे, हा क्षण अवास्तव वाटतो, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे सोनम कपूर, सर्वात धाडसी आई. तसेच सर्वात प्रेमळ बाबा आनंद आहुजा. आपल्या भाच्याला पाहून रिया खूपच भावूक झालेली फोटोत पाहायला मिळते. बाळाला पाहताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी शनिवारी आपल्या बाळाचे या जगात स्वागत केले. या जोडप्याने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोशल मीडिया पोस्टवर त्यांनी लिहिले की, 20/08/2022 रोजी आम्ही आमच्या सुंदर बाळाचे स्वागत केले. या प्रवासात आम्हाला साथ देणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे, परंतु आपल्याला माहित आहे की आमचे जीवन कायमचे बदलले आहे. सोनम आणि आनंद…

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचे 2018 मध्ये लग्न झाले. लग्नाच्या जवळपास चार वर्षानंतर या जोडप्याने त्यांच्या पहिल्या अपत्याचे स्वागत केले आहे. आई होण्यापूर्वी गरोदरपणात सोनम कपूरने पालकत्वाच्या कर्तव्यावर बोलताना एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ती आणि तिचा पती आनंद मुलाची जबाबदारी समानपणे पार पाडतील. आमच्या पालकांनी आम्हाला ज्या पद्धतीने वाढवले, त्याच पद्धतीने आम्ही आमच्या मुलाची काळजी घेणार असल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते.