सुशांतच्या आठवणीत भावूक झाली रिया चक्रवर्ती, बह...

सुशांतच्या आठवणीत भावूक झाली रिया चक्रवर्ती, बहीण श्वेतानेही सुशांतसाठी लिहिली भावनिक पोस्ट (Rhea Chakraborty remembers Sushant Singh Rajput on his 2nd death anniversary, Sister Shweta pens emotional note)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज भलेही आपल्यात नसला तरी, त्याचा अभिनय आणि टॅलेंटच्या बळावर तो आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. सुशांतला जाऊन आज 2 वर्षे पूर्ण झाली. सुशांतच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्याचे कुटुंबिय, मित्रपरिवार, चाहते त्याच्या आठवणींनी भावूक झाले आहेत. यानिमित्त सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि त्याची बहीण श्वेता कीर्ति सिंहने सुशांतच्या आठवणी जागवल्या आहेत.

रिया चक्रवर्तीने सुशांत व तिचे अनसीन फोटो शेअर करुन त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सुशांतसोबतचे काही रोमॅंण्टिक फोटो शेअर करत, रोज तुझी आठवण येते अशी कॅप्शन तिने दिली आहे. एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या रिया आणि सुशांतचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. सुशांतच्या चाहत्यांना देखील हे फोटो आवडल्यामुळे ते सुद्धा कमेंट करुन सुशांतसाठी भावूक झाले आहेत.

सुशांत त्याच्या बहीणींचा खूप लाडका होता. भावाच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त सुशांतची बहीण श्वेताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने सुशांतचा एका लहान मुलासोबतचा फोटो शेअर करत  असे लिहिले आहे की, आज तुला जाऊन दोन वर्षे पूर्ण झाली. पण ज्या मुल्य आणि सिद्धांतासाठी तू कणखरपणे उभा असायचास, आज त्यामुळेच तू अमर झाला आहेस.  दया, करुणा आणि सगळ्यांसाठी प्रेम हे तुझे वैशिष्ट्य होते.  तुला सगळ्यांसाठी खूप काही करायचे होते. आम्ही तुझ्या सन्मानासाठी तुझ्या वैशिष्ट्यांचे आणि आदर्शांचे पालन करत राहू. आम्ही तुझ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करु. एका दिव्याचा एमोजी शेअर करून श्वेताने पुढे लिहीले,

चला आज आपण दिवे तेववून कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न करु. सोबतच तिने ‘#फॉरएवरसुशांत’हा हॅशटॅग वापरला आहे.

आज अनेक कलाकारांनी सुशांतच्या आठवणीत पोस्ट शेअर केल्या आहेत. व त्याला श्रद्धांजलि वाहिली आहे. आज पुन्हा एकदा #बायकॉटबॉलीवुड हा हॅशटॅग ट्रेंडला आला आहे.