सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसानिमित्त रिया चक्...

सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसानिमित्त रिया चक्रवर्तीने शेअर केला फोटो, युजर्सनी केले ट्रोल (Rhea Chakraborty Gets Massively Trolled As She Shares Unseen Photos Of Late Sushant Singh Rajput On His Birth Anniversary)

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आजही एक गूढच आहे. सुशांतला आजपर्यंत न्याय मिळाला नाही याचे आजही चाहत्यांना कुठेतरी वाईट वाटते. त्याचबरोबर चाहते सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवरला दोषी मानत असल्यामुळे ते तिच्यावर नाराज आहेत.


चौकशी दरम्यान ड्रग्ज कनेक्शनमध्ये रियाचे नाव जोडले गेले होते पण आता ती जेलमधून बाहेर आली आहे, रिया दरवर्षी सुशांतसाठी त्याच्या वाढदिवसाला काहीना काहीतरी प्रेमळ पोस्ट टाकते आणि त्याच्या आठवण जाग्या करते. आज पुन्हा एकदा सुशांतच्या वाढदिवसानिमित्त चाहते आणि त्याच्याशी संबंधित सर्व लोक त्याची आठवण काढत आहेत आणि खूप भावूक होत आहेत.

रियाने अभिनेत्यासाठी एक खास पोस्ट देखील शेअर केली असून त्यात तिने दोन फोटो शेअर केले.
पहिल्या छायाचित्रात दोघेही चहाच्या कपामागे लपलेले दिसत आहेत आणि दुसऱ्या छायाचित्रात रिया सुशांतसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. लोक सुशांतला मिस करत आहेत, बहुतेक लोक रियाला ट्रोल आणि शिव्या देत आहेत.


ती सहानुभूती मिळविण्यासाठी हे सर्व करत असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे. या सगळ्या पोस्टचा काही उपयोग नाही, जनता तुला कधीच माफ करणार नाही, अशी कमेंट एकाने केली. दुसर्याो युजरने लिहिले – या प्रकारच्या पोस्टला आता काही अर्थ नाही. एका चाहत्याने कमेंट केली की तिला कळले आहे की केस पुन्हा सुरू होणार आहे, त्यामुळे लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून तिने ही पोस्ट पटकन पोस्ट केली. अनेक युजर्स असेही म्हणत आहेत की तिने सुशांतला मारले आहे…


अनेक चाहते खूप भावूक झालेले पाहायला मिळत आहेत. 14 जून 2020 रोजी सुशांत मुंबईतील फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याची गर्लफ्रेंड रियावर गंभीर आरोप केले होते. रिया तुरुंगात गेली पण तिला क्लीन चिट मिळाली. पण चाहते आणि कुटुंबीय अजूनही सुशांतच्या मृत्यूसाठी रियाला जबाबदार मानतात.