कोकणातील खेडेगावच्या प्रतिकृतीमध्ये निसर्गाशी ए...

कोकणातील खेडेगावच्या प्रतिकृतीमध्ये निसर्गाशी एकरूप होण्याची संधी (Replica Of Konkan Village Can Take You Back To The Root)

गेली दोन दोन वर्षे सगळंच थांबले होते त्यावेळेस लोकांना ऑक्सिजन आणि निसर्ग याची खरी किंमत कळली, आपण किती स्वार्थी आहोत याच जिवंत उदाहरण कोरोनाचा काळ माणूस निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेले असताना आपण त्याची जोपासना कधीच करत नाही.  असूदेत, याचाच पुरे-पूर विचार करून कोरोनाच्या काळात गोविंद वाघांनी यांनी एक निसर्गरम्य गाव वसवण्याचा ध्यास घेतला आणि तो कोरोनाकाळात पूर्ण देखील करून दाखविला. मुंबई पासून हाकेच्या अंतरावर कर्जत येथील खालापूर मध्ये त्यांनी ३६ एकरांमध्ये एक नैसर्गिक गाव वसविले आहे ज्याचे नाव आहे ‘मोंटेरिया व्हिलेज’ यंदा पावसाळ्यात नवीन कोणते ठिकाण पाहावे या विचारात असाल तर एक कोकणातील खेडंच तेथे वसवले आहे आणि आपल्या डोळ्यासमोर उभं राहील अगदी जसच्या-तस गावाकडची वाडी, सरपंचाच घर, कुंभाराच घर, सुतार काम करणारे लोक, गावातील बाजार, हॉटेल, तलाव, मंदीर, बालवाडी, गायीचा गोठा, शेती, बागा, जंगल गावातील आदिवासी लोक शेती करणारे शेतमजूर जंगलातील मातीच्या पायवाटा अगदी आपल्या गावासारखाच खरं खूर गाव गोविंद वाघांनी यांनी वसवले आहे. त्याचा मागचा उद्द्येश इतकाच की शहरातील कोंदटलेल्या वातावरणातून थोडीशी सवड काढून आपल्या कुटुंबासोबत निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवावा आणि निसर्गाशी एक रूप व्हावे ह्यासाठीच त्याच स्लोगन आहे ‘बैक टू द रूट’ मोंटेरिया व्हिलेज. सगळं पाहिलं आणि मनात आलं माझ्या अनेक मित्रांसाठी एक आठवण म्हणून तेथील वर्णन आणि फोटो शेअर करूयात.   

तुम्ही पण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ‘मोंटेरिया व्हिलेज’ ला नक्की भेट द्या, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्की आवडेल असे अस्सलखीत उभं केलेलं गाव आणि तेथील ‘द कबिला’ हा तंबूवजा कॉनसेप्ट, मुंबई व पुणे शहरांपासून केवळ दोन तासांच्या अंतरावरील एक छोटा वीकेण्ड गेटवे, ‘द कबिला’ (तंबू मध्ये राहण्याचा) अनुभव देतो. बंजारा या भटक्या समाजापासून प्रेरित ‘द कबिला’ तंबू वजा छोटेखानी गाव म्हणजे शहराच्या धकाधकीपासून दूर भटक्या आयुष्याचा अनुभवायचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये साधेपणा व आधुनिक आयुष्यातील आरामदायी सुविधांचा परिपूर्ण तोल साधण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला अत्यंत आवश्यक अशी विश्रांती घेण्यासाठी व नव्याने ऊर्जा प्राप्त करण्यासाठी एक छान ठिकाण म्हणजेच मोंटेरिया व्हिलेज आहे. मोंटेरिया खेड्यातील ३६ एकर परिसरात पसरलेल्या ‘द कबिला’ मध्ये ५० सुसज्ज तंबू चमचमणाऱ्या ताऱ्यांच्या अस्सल खेडे गावाच्या वातावरणात तयार केले आहे. या कॅम्पसाइटवर पाहुण्यांसाठी सुसज्ज टॉयलेट्स व बाथरूम्सही आहेत. मोंटेरिया गाव कॅम्पर्सना अनेक अनोखे अनुभव व आकर्षक उपक्रम उदा. कला, संस्कृती व पारंपरिक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाची एक झलक दाखवते.

मोंटेरिया गावी कसे जाल – मुंबई-पुण्यापासून दोन तासाच्या अंतरावर खालापूर तालुक्यात रस्ते मार्गे किंवा कर्जत स्टेशन पासून रिक्षा किंवा चारचाकी वाहनाने जाता येईल
– छायाचित्रे : नंदू धुरंधर