माझ्या नातेवाईकांनी माझे कपडे कात्रीने कापले...

माझ्या नातेवाईकांनी माझे कपडे कात्रीने कापले…उर्फीने सांगितला तिच्या आयुष्यातला भयानक किस्सा…(Relatives Chopped My Dresses With Scissor: Uorfi Javed Narrates The Shocking Incidence)

मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या कामासाठी नाही तर भलत्याच गोष्टींसाठी चर्चेत असतात. हे कलाकार कधी त्यांच्या बेताल वागण्या-बोलण्यामुळे किंवा कधी त्यांच्या अजब फॅशनमुळे चर्चेत असतात. या कलाकारांपैकीच एक म्हणजे अभिनेत्री उर्फी जावेद. ती सध्या तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.

उर्फी नेहमीच बोल्ड आणि बिनधास्तपणे जगते. ती नेहमी तिचे हॉट आणि मादक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांकडून सुद्धा तिच्या फोटोंना उत्तम प्रतिसाद मिळतो.

उर्फीचा जन्म 15 ऑक्टोबर 1997ला झाला. तिचे बालपण लखनऊमध्ये गेले. पुढे तिने फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी मिळवली. ती लहानपणापासूनच खूप बोल्ड होती. उर्फीने  ‘बडे भैया की दुल्हनिया’, ‘चंद्रा नंदिनी’,’ मेरी दुर्गा’ , ‘सात फेरो की हेरा फेरी’,’ ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसोटी जिंदगी की’या मालिकांमध्ये काम केले. मालिकांसोबतच तिने वेब सिरीजमध्ये पण काम केले आहे. बिग बॉस या वादग्रस्त शो मध्ये तिने चांगलाच धुमाकूळ घातला होता.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत उर्फीने तिच्या आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला, सध्या सोशल मीडियावर उर्फीचे बोल्ड फोटो व्हायरल होत असतात. ती तिच्या यशाचे श्रेय फोटोग्राफरना देते. उर्फीच्या मते, त्यांच्यामुळेच ती इतकी  लोकप्रिय झाली आहे. अनेकदा तिच्यावर आरोप होतात की ती फोटोग्राफरना पैसे देऊन तिचे फोटो शेअर करायला सांगते. पण तसे काही नसल्याचे ती म्हणाली. पुढे उर्फीने सांगितले की, ‘’माझे जेव्हा लग्न होईल तेव्हा हे फोटोग्राफर तिथले प्रमुख पाहुणे असतील. ‘’

अनेक जण तिच्या मरणाची वाट पाहत आहेत. पण याने तिला काहीच फरक पडत नसल्याचे तिने सांगितले.’’ मला बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. पण मी महिन्यातले दोन दिवस रडत असते. काही वर्षापूर्वी माझ्या वडिलांचे काही नातेवाईक घरी आले होते. मी नेहमीच असे बोल्ड कपडे घालते. मात्र त्यातील काही नातेवाईकांना माझे कपडे आवडले नाही तर त्यांनी सर्व राग माझ्या कपड्यांवर काढला. आणि माझे कपडे चक्क कात्रीने कापून काढले. ‘’असेही तिने सांगितले.