रेखाने सादर केल्या अद्भूत कला (Rekha showed ama...

रेखाने सादर केल्या अद्भूत कला (Rekha showed amazing skills in ‘Indian Idol 12’; Contestants were stunned by this style)

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
सोनी टीव्हीवरील लोकप्रिय ‘इंडियन आयडल १२’ या गाण्याच्या रिॲलिटी शोचा पुढील भाग हा अतिशय खास असणार आहे. आपल्याला माहीत आहेच की या शोमध्ये पाहुणे म्हणून बऱ्याच बॉलिवुड रथीमहारथींची हजेरी लागली आहे. आताच्या या भागामध्ये बॉलिवूडची दिवा रेखाची ग्रॅंड एंट्री होणार आहे. ‘इंडियन आयडल १२’ या शोमध्ये रेखाच्या आत्तापर्यंत सगळ्यांपासून लपून राहिलेल्या काही अद्‌भूत कला आपल्याला पाहवयास मिळणार आहेत. ‘इंडियन आयडल १२’ च्या या विशेष भागामध्ये सगळ्यांचा लाडका स्पर्धक पवनदीप राजन सोबत रेखाने तोडीस तोड ढोलकी वाजवलेली पाहायला मिळणार आहे. यासंबंधीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

रेखा उत्तम रित्या ढोलकी वाजवू शकते, हे तिने आत्तापर्यंत आपल्यापासून लपवून ठेवले असले तरी फोटोमध्ये रेखा ढोलकीवर थाप देत पवनदीपला जोरदार टक्कर देत असलेली दिसत आहे. एवढंच नाही तर रेखा हार्मोनियमही उत्तम वाजविते. इंडियन आयडलच्या स्पर्धकांमध्ये बसून हार्मोनियमवर ताल धरत गाण्याचा सूर लावताना रेखा दिसतेय्‌. रेखाच्या या कलासादरीकरणाला सगळ्यांकडून तितकाच भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
सदाबहार अभिनेत्री रेखाच्या या पैलूंबाबत अगदी नेमक्या लोकांना माहिती आहे. इंडियन आयडलच्या मंचावर सादर झालेल्या रेखाच्या या अद्‌भूत कला पाहून प्रेक्षक, स्पर्धक आणि परीक्षक असे सगळेच भारावून गेले. आणि आता शोचा प्रोमो पाहिल्यानंतर दर्शकही हा शो पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. रेखाला एका वेगळ्याच अंदाजात पाहण्याची ते आतूरतेने वाट पाहत आहेत.