मनीष मल्होत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो आ...

मनीष मल्होत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो आले समोर, काजोल, रवीना टंडन आणि करण जोहरसोबत रेखानेही लावली हजेरी (Rekha, Kajol, Raveena Tandon Come Together For Manish Malhotra’s Star-Studded Bash, See Photos)

बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा ​​आज 56 वा वाढदिवस आहे. मनीषने आपल्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते, या पार्टीला रवीना टंडन, काजोल, करण जोहर आणि इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री रेखाने उपस्थित लावली होती. रवीना टंडनने पार्टीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा आज 56 वा वाढदिवस आहे. मात्र काल रात्रीपासूनच त्यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. डिझायनर मनीष मल्होत्राचा वाढदिवस खास बनवण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.

चित्रपट निर्माता करण जोहर, रवीना टंडनपासून ते काजोल आणि रेखापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मनीषच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. मनीषच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो अभिनेत्री रवीना टंडनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत रवीनाने मनीष मल्होत्रासाठी एक खास नोटही लिहिली आहे.

कॅप्शनमध्ये रवीनाने लिहिले की, माझा सर्वात चांगला मित्र, आणि माझ्या आयुष्यातील सर्व रहस्ये जाणणाऱ्या माझ्या खास मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. लव्ह यू लॉटस्,  माय एव्हर यंग माय एव्हरग्रीन @manishmalhotra05. तू खूप दयाळू आणि मदत करणारा आहेस. तसेच तू आतून आणि बाहेरून खूप सुंदर व्यक्ती आहेस. मी तुझ्यावर प्रेम करते सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये, ज्येष्ठ अभिनेत्री रेखाने पार्टीतील लाइमलाइट चोरली असे म्हटल्यास हरकत नाही. फोटोमध्ये रेखा गोल्डन कलरची साडी नेसली आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्यासोबत काजोल, मनीष, करण जोहर आणि रवीना हे देखील दिसत आहेत. बर्थडे बॉय मनीषसह सर्वजण हसताना आणि कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत.

 मनीष मल्होत्रा ​​इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे. बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी आणि चित्रपट कलाकारांसाठी मनीष स्टाइलिश आउटफिट्स डिझाइन करतो. फॅशनशी संबंधित सर्व अॅक्सेसरीजसाठी बॉलिवूड सेलिब्रिटी मनीषकडे जातात.