रेखासमोर काम करायला, करिश्मा – मनीषाची उड...

रेखासमोर काम करायला, करिश्मा – मनीषाची उडाली होती घाबरगुंडी (Rekha and Karisma Kapoor Played the Role of Sautan in This Film, Lolo was Nervous About Working with Evergreen Actress)

चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर आपण अनेकदा अभिनेत्रींना एकमेकींच्या सवतीच्या भूमिकेत पाहतो. परंतु, तुम्ही चिरतरुण अभिनेत्री रेखा आणि करिश्मा कपूर या सवती असलेला जुबैदा हा हिंदी चित्रपट पाहिला आहे का? या चित्रपटाशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया. जुबैदा ही राजस्थानच्या मारवाड राजघराण्याशी निगडीत महाराजा हनवंत सिंह आणि झुबेदा यांच्या प्रेमावर आधारीत गोष्ट आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

जुबैदामध्ये करिश्मा कपूर आणि चिरतरुण अभिनेत्री रेखा ह्या एकमेकांच्या सवती झाल्या होत्या. तर मनोज वाजपेयी हा मारवाडचा राजा हनवंत सिंहची भूमिका निभावत होता. गमतीची गोष्ट म्हणजे बॉलिवूडच्या एवढ्या दिग्गज अभिनेत्रीसोबत काम करायचे म्हणून लोलोची घाबरगुंडी उडाली होती. तिने घाबरतच सिनेमा साइन केला होता.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

सिनेमाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, करिश्माने जेव्हा ऐकलं की, सिनेमात रेखासोबत तिला काम करायचेय, तेव्हा चित्रपट साइन करण्यापूर्वी ती अतिशय घाबरलेली होती. याची दोन कारणं होती; एकतर करिश्माला रेखाजींसोबत काम करायचं होतं आणि दुसरं म्हणजे २००१ पर्यंत करिश्माने असा एकही गंभीर रोल केलेला नव्हता.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री रेखा आणि करिश्मा एकमेकांच्या सवती बनल्या असल्या तरी झुबेदाची मुख्य भूमिका करिश्मानेच केली होती. या भूमिकेसाठी करिश्माला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्काराही मिळाला. या चित्रपटात रेखाच्या सवतीची भूमिका करणाऱ्या करिश्माने एका मुलाखतीत सांगितले होते की, हा चित्रपट साइन करण्यासाठी तिला बराच वेळ लागला, कारण ती रेखासोबत काम करण्यासाठी स्वत:ला तयार करू शकत नव्हती आणि ती रेखासोबत काम करण्यासाठी खूप घाबरलीही होती.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

या चित्रपटाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी झुबेदाच्या व्यक्तिरेखेसाठी करिश्मापूर्वी मनीषा कोईरालाची निवड केली होती, परंतु ती देखील रेखाबरोबर काम करण्यास घाबरली होती, म्हणून तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला. मनिषानंतर जेव्हा करिश्माला ही ऑफर आली तेव्हा रेखाचे नाव ऐकून ती देखील घाबरली, पण नंतर तिने हिंमत एकवटून चित्रपट साइन केला. हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नसला तरी या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले होते.