जाफरानी हर्ब टिक्का (Zafrani Herb Tikka)

जाफरानी हर्ब टिक्का (Zafrani Herb Tikka)

साहित्य : 1 किलो चिकन ब्रेस्ट (बोनलेस),  250 ग्रॅम चीज,  100 मि.ली. क्रीम, पुदिना अर्धा जुडी (बारीक चिरून), अर्धा टीस्पून केशर (दुधात भिजवलेले), 1 टीस्पून मिक्स हर्ब, 30 मिली सूर्यफूल तेल, चवीनुसार मीठ आणि मिरपूड.
सजावटीसाठी : 1 कांदा, 1 टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती : चीज किसून घ्या आणि त्यात क्रीम घाला. त्यात मिक्स हर्ब, केशर आणि चिरलेला पुदिना घाला. मीठ आणि मिरपूड घालून शिजवा. चिकन चांगले मॅरीनेट करून ग्रिल करा. हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.