टू कलर्ड वडा (Yummy Two Coloured Vada)

टू कलर्ड वडा (Yummy Two Coloured Vada)

टू कलर्ड वडा

साहित्य : 250 ग्रॅम उकडून कुस्करलेले बटाटे, 1 टेबलस्पून तेल, थोडे कडिपत्ते, 2 हिरव्या मिरच्या, 1 कोथिंबिरीची जुडी, 1 पुदिन्याची जुडी, 50 ग्रॅम वरीचं पीठ, 50 ग्रॅम राजगिर्‍याचं पीठ, 3 थेंब खायचा हिरवा रंग, 3 थेंब खायचा नारिंगी रंग, स्वादानुसार सैंधव, चिमूटभर खायचा सोडा, आवश्यकतेनुसार पाणी.
कृती : हिरवं वाटण तयार करण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून कडिपत्ताची फोडणी करा. ही फोडणी थंड झाल्यानंतर कुस्करलेल्या बटाट्यांमध्ये घालून, त्यात मीठ, हिरवं वाटण आणि खायचा हिरवा रंगही एकत्र करा. एकजीव मिश्रण तयार करून त्याचे मध्यम आकाराचे वडे तयार करून घ्या.
एका बाऊलमध्ये राजगिर्‍याचं पीठ, वरीचं पीठ, खायचा सोडा, नारिंगी रंग आणि आवश्यकतेनुसार पाणी एकत्र करून भज्याप्रमाणे मिश्रण तयार करा. तयार केलेले वडे या मिश्रणामध्ये घोळून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम टू कलर्ड वडे हॉट अँड स्वीट चटणीसोबत सर्व्ह करा.