वॉलनट-मँगो लस्सी आणि गुजराती मँगो कढी (Walnut M...

वॉलनट-मँगो लस्सी आणि गुजराती मँगो कढी (Walnut Mango Lassi And Gujarati Mango Kadhi)

वॉलनट-मँगो लस्सी

खरं तर तुम्ही आंब्याचे निरनिराळे प्लेवर्स चाखले असणार, परंतु आज आपल्याला वॉलनट मँगो लस्सी बनवायची आहे. मँगो लस्सी बनवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. एकदा ही लस्सी प्या नि सर्व मरगळ दूर करा.

साहित्य :

३०० ग्रॅम पिकलेले आंबे (साल काढून तुकड्यांत कापून घ्या)

८०० ग्रॅम दही

अर्धा कप दूध

४ आइस क्यूब्स (क्रश करून घ्या)

पाव टीस्पून वेलची पावडर

८-१० अख्खे अक्रोड

सजावटीसाठी :

जाडसर किसलेले अक्रोड, कोको पावडर आणि वेलची पावडर

कृती : मिक्सरमध्ये आंब्याचे तुकडे, अक्रोड, दही, क्रश केलेला आइस आणि वेलची पूड घालून व्यवस्थित फिरवून घ्या.

मिश्रण जास्त दाट असल्यास थोडं दूध घालून पुन्हा फिरवून घ्या.

तयार मिश्रण एका ग्लासमध्ये काढा आणि सजवून थंडगार सर्व्ह करा.

 

गुजराती मँगो कढी (Gujarati Mango Kadhi)

गुजराती पदार्थांचे शौकीन आहात, चला तर मग आज आंबट-गोड चवीची गुजराती मँगो कढी बनवूया. ही कढी स्टीम राइस सोबत सर्व्ह केली जाते. या कढीचा स्वाद तुम्हाला नक्की आवडेल.

 

साहित्य :

प्रत्येकी १-१ कप आंब्याचा रस आणि आंबट दही

प्रत्येकी २-२ टेबलस्पून बेसन आणि तेल

१ तुकडा आलं किसलेलं

२ चिरलेल्या हिरव्या मिरच्या

प्रत्येकी अर्धा- अर्धा टीस्पून मेथीचे दाणे, हळद, जिरं आणि मोहरी

पाव टीस्पून हिंग पावडर

२-३ लाल मिरच्या

कढीपत्ता आणि मीठ चवीनुसार

कृती :

एका बाऊलमध्ये बेसन, आलं, हिरवी मिरची आणि दही घालून फेटून घ्या.

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मेथीचे दाणे, मोहरी, जिरं, अख्ख्या लाल मिरच्या , कढीपत्त्याची पानं आणि हिंग यांची फोडणी द्या. नंतर त्यात हळद घालून परता.

दही आणि बेसनचं मिश्रण, आंब्याचा रस, मीठ आणि ३ कप पाणी घालून हे मिश्रण २०-२५ मिनिटं मंद आचेवर शिजू द्या.

तयार मँगो कढी स्टीम राइससोबत गरम-गरम सर्व्ह करा.