व्हेज पटियाला (Veg Patiala)

व्हेज पटियाला (Veg Patiala)

व्हेज पटियाला

साहित्य: 250 ग्रॅम मिक्स भाज्या (फरसबी, गाजर, कोबी, फ्लॉवर, मटार, भोपळी मिरची), 2 मोठे कांदे व 2 मोठे टोमॅटो पेस्टसाठी, प्रत्येकी 30 ग्रॅम काजू व मगज (खरबूजाच्या बिया), 2 पापड, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, चिमूटभर हळद, सजावटीसाठी किसलेले पनीर, अर्धा टीस्पून जिरे, 1 टेबलस्पून फ्रेश क्रीम, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून एव्हरेस्ट किचन किंग मसाला, अर्धा टीस्पून जिरे पूड व मीठ चवीनुसार.

कृती: सगळ्या भाज्या उकडून घ्या. कांदा व टोमॅटो मिक्सरमधून वेगवेगळे वाटून घ्या. कढईत तेल गरम करून आलं-लसूण पेस्ट टाकून परतून घ्या. वाटलेला कांदा व टोमॅटो टाका. उकडलेल्या भाज्या टाकून मीठ, हळद, धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला व एव्हरेस्ट किचन किंग मसाला टाकून परतून घ्या. एक पापड ओला करून त्यावर शिजलेली भाजी टाकून रोल बनवून छोटे-छोटे तुकडे करा. दुसर्‍या कढईत तेल गरम करून हे रोल डीप फ्राय करून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून आलं-लसूण पेस्ट टाका. कांदा-टोमॅटोची पेस्ट टाका. काजू व मगज पेस्ट टाका. यात मीठ, मिरची, धणे पूड, जिरे पूड व गरम मसाला टाका. तयार ग्रेव्हीत तळलेले पापडाचे रोल टाकून गरम-गरम सर्व्ह करा.