व्हेेज कोल्हापुरी (Veg kolhapuri)

व्हेेज कोल्हापुरी (Veg kolhapuri)

व्हेेज कोल्हापुरी

साहित्य: प्रत्येकी 100 ग्रॅम फ्लॉवर, कोबी, गाजर, मटार, फरसबी, भोपळी मिरची, 1 टेबलस्पून किसलेला ओला नारळ, 2 उभे व पातळ चिरलेले कांदे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या, 3 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून एव्हरेस्ट चाट मसाला, 1 टीस्पून कसुरी मेथी, मीठ चवीनुसार, चिरलेली कोथिंबीर व बटर.

कृती: सगळ्या भाज्या कापून, उकडून घ्या. एका कढईत तेल गरम करून लसूण व मिरची पेस्ट टाका. कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत परता. टोमॅटो टाकून तेल सुटेपर्यंत परता. यात हळद, मीठ, लाल मिरची पूड, एव्हरेस्ट चाट मसाला व कसुरी मेथी टाका. आता उकडलेल्या भाज्या टाका. किसलेलं खोबरं टाका. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.