व्हेज कढई (Veg. Kadhai)

व्हेज कढई (Veg. Kadhai)

व्हेज कढई

साहित्यः 250 ग्रॅम मिक्स भाज्या (फरसबी, गाजर, कोबी, फ्लॉवर, मटार, भोपळी मिरची, बेबीकॉर्न, पनीर व मशरूम), 2 मोठे कांदे व 2 मोठे टोमॅटो पेस्टसाठी, 1 गोलाकार कापलेला कांदा व भोपळी मिरची, 1 उभी चिरलेली हिरवी मिरची, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, चिमूटभर हळद, सजावटीसाठी किसलेले पनीर, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून क्रीम, 1 टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून एव्हरेस्ट हळद, अर्धा टीस्पून जिरे पूड व मीठ चवीनुसार.

कृती: सगळ्या भाज्या उकडून घ्या. कांदा व टोमॅटो वेगवेगळे मिक्सरमधून वाटून घ्या. कढईत तेल गरम करून बडीशेप व जिरे टाका. चिरलेला कांदा व भोपळी मिरची टाका. आलं-लसूण पेस्ट, वाटलेले टोमॅटो व कांदा घालून परता. उकडलेल्या भाज्या टाका. यात मीठ, एव्हरेस्ट हळद, धणे पूड, जिरे पूड व गरम मसाला टाकून थोडा वेळ शिजवा. किसलेले पनीर व कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.