व्हेज हांडी (Veg. Handi)

व्हेज हांडी (Veg. Handi)

व्हेज हांडी

साहित्य: अर्धा किलो मिक्स व्हेजिटेबल (फ्लॉवर, गाजर, फरसबी व मटार), प्रत्येकी 1 टीस्पून बारीक चिरलेले लसूण, आलं व हिरवी मिरची, 1 टीस्पून गरम मसाला, 100 ग्रॅम मावा, 1 टेबलस्पून फ्रेश क्रीम, गरजेनुसार रेड ग्रेव्ही.

कृती: भाज्या उकडून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून आलं-लसूण व हिरवी मिरची टाका. रेड ग्रेव्ही, गरम मसाला, मीठ, मावा टाकून 2-3 मिनिटे शिजवा. भाज्या घालून थोडा वेळ शिजवा. क्रीम टाकून सर्व्ह करा.

रेड ग्रेव्ही बनवण्याची कृती

साहित्य: प्रत्येकी 50 ग्रॅम काजू, मगज, शेंगदाणे, तीळ व खसखस (सर्व उकडून पेस्ट बनवून घ्या.), प्रत्येकी 1 टीस्पून लसूण, लाल मिरची व आलं पेस्ट, 10-12 कांद्यांची पेस्ट (कांदा भाजून वाटून पेस्ट बनवा.), 3-4 टोमॅटोची प्युरी (उकडून, सोलून वाटून घ्या.), अख्खा गरम मसाला (तमालपत्र, काळी मिरी, जिरे, लवंग, मोठी वेलची, चक्री फूल), प्रत्येकी 1 टीस्पून हळद व गरम मसाला, एक वाटी दही, मीठ चवीनुसार, 2 टेबलस्पून तेल.

कृती: पॅनमध्ये तेल गरम करून सगळे अख्खे मसाले टाका. आलं-लसणाची पेस्ट टाकून परता. नंतर कांदा व टोमॅटो परतून घ्या. हळद, गरम मसाला, दही व मीठ टाकून तेल सुटेपर्यंत परता. काजू पेस्ट टाकून थोडा वेळ शिजवा.

टीप: रेड ग्रेव्ही बनवण्यासाठी नेहमीच वरील साहित्य व कृतीचा वापर करावा.