व्हेज गोल्ड कॉइन (Veg. Gold Coin)

व्हेज गोल्ड कॉइन (Veg. Gold Coin)

व्हेज गोल्ड कॉइनसाहित्य :
2 ब्रेडचे स्लाइस (गोलाकार कापून घ्या), अर्धा कप उकडलेल्या मिश्र भाज्या (फ्लॉवर, कोबी, फरसबी इत्यादी), 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 उकडलेला बटाटा,
2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), थोडे पांढरे तीळ, स्वादानुसार मीठ व पांढरी मिरी पूड, तळण्याकरिता तेल.

कृती : सर्व भाज्या, बटाटा, हिरव्या मिरच्या, मीठ, मिरी पूड आणि कॉर्नफ्लोअर यांचं एकजीव मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण ब्रेडच्या स्लाइसवर ठेवून त्यावर दुसरी स्लाइस ठेवा आणि ब्रेडच्या कडा दाबून बंद करा. त्यावर तीळ भुरभुरून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.