व्हॅलेंटाइन डे स्पेशल : चॉकलेट-व्हॅनिला पुडिंग ...

व्हॅलेंटाइन डे स्पेशल : चॉकलेट-व्हॅनिला पुडिंग (Valentine Day Special: Chocolate-Vanilla Pudding)

आजचा व्हॅलेंटाइन डे स्पेशल बनवायचा असेल तर आपल्या प्रेमाच्या व्यक्तिंना द्या स्पेशल व्हॅलेंटाइन ट्रीट. स्वतःच्या हातांनी बनविलेले पुडिंग त्यांना खिलवा आणि त्यांच्याकडून वाहवा मिळवा. मग ट्राय करून पाहताय ना.

साहित्यः
५० ग्रॅम डार्क चॉकलेट (किसून घ्या), प्रत्येकी ४-४ टेबलस्पून कोको पावडर आणि कॉर्न फ्लोअर, चिमुटभर मीठ, अर्धा कप कंडेन्स मिल्क, दीड कप दूध, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, ४ टेबलस्पून फ्रेश क्रिम, सजावटीकरिता थोडे चॉको चिप्स.

कृतीः एका बाऊलमध्ये कोको पावडर, कॉर्न फ्लोअर आणि मीठ चाळणीने चाळून घ्या. त्यात दूध, कंडेन्स मिल्क, फ्रेश क्रिम आणि व्हॅनिला इसेन्स घालून सर्व साहित्य चांगले एकत्र करून घ्या. आचेवर पॅन ठेवून गरम करा. मग त्यात वरील एकत्र केलेले मिश्रण घालून मंद आचेवर शिजू द्या. त्यात किसलेले डार्क चॉकलेट घालून सतत ढवळत राहून शिजवा. मिश्रण घट्ट झालं की आचेवरून उतरवा. थंड झाल्यानंतर सर्व्हिंग ग्लासमध्ये घाला. नंतर २-३ तास सेट होण्याकरिता फ्रिजमध्ये ठेवून द्या. सेट झाल्यानंतर त्यावर १ स्कूप फ्रेश क्रिम घाला आणि वरून चॉको चिप्स भुरभुरा.