कडिपत्ता चिवडा, कांदा-लसणीचा चिवडा (Two Varie...

कडिपत्ता चिवडा, कांदा-लसणीचा चिवडा (Two Varieties Of Different Taste Chivda)

कडिपत्ता चिवडा

साहित्य : 1 किलो तळलेले जाड पोहे, 3 डहाळ्या ताजा कडिपत्ता, 1 वाटी हिरव्या मिरच्यांचे बारीक काप, 1 वाटी शेंगदाणे, स्वादानुसार मीठ, 1 चमचा आमचूर पूड, 1 वाटी तेल.
कृती : एक वाटी तेलात शेंगदाणे, मिरच्या आणि कडिपत्ता खरपूस तळून कुरकुरीत करा. एका पातेल्यात पोहे, शेंगदाणे, मीठ आणि आमचूर पूड एकत्र करा. मिरच्या आणि कडिपत्ता हाताने चुरून चिवड्यात घाला. हातानेच चिवडा अलगद व्यवस्थित कालवा. हा शुभ्र चिवडा चवीला छान लागतो.

कांदा-लसणीचा चिवडा

साहित्य : 1 किलो पातळ पोहे, पाव वाटी कांदा-लसूण मसाला, दीड वाटी वाळवलेला कांदा, पाव वाटी ठेचलेला लसूण, 4 चमचे आमचूर पूड, 2 चमचे पिठीसाखर, स्वादानुसार मीठ, अर्धा वाटी शेंगदाणे.
कृती : पातळ पोहे खमंग परतवून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे, लसूण आणि कांदा परतवा. आच मंद करून, त्यात उर्वरीत मसाले घाला. पोहे मोठ्या पातेल्यात घेऊन त्यावर फोडणी घाला. मीठ घालून चिवडा अलगद चांगला हलवा. हा झणझणीत चवीचा कांदा-लसणीचा चिवडा छान लागतो.