ओली हळद-आल्याचं लोणचं (Turmeric-Ginger Pickle)

ओली हळद-आल्याचं लोणचं (Turmeric-Ginger Pickle)

ओली हळद-आल्याचं लोणचं

साहित्य : दीड कप बारीक चिरलेली ओली हळद, 1 कप बारीक चिरलेलं आलं, अर्धा कप बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 4 टीस्पून मीठ, 3 ते 4 लिंबू, 8 ते 10 मेथी दाणे, अर्धा कप मोहरी, 1 कप तेल, 1 टीस्पून हिंग.
कृती : एका वाडग्यात हळद, आलं, मिरच्या, लिंबाचा रस आणि मीठ चांगलं एकजीव करा. हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा.
दुसर्‍या दिवशी मोहरी मंद आचेवर कोरडी भाजून घ्या. नंतर जाडसर वाटा. त्यात हळद-आल्याचं मिश्रण एकत्र करा. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून, त्यात मेथी दाणे परतून घ्या. आच बंद करून त्यात हिंग घाला. ही फोडणी हळद-आल्याच्या मिश्रणावर ओतून चांगली एकजीव करा. हे लोणचं स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा. फोडणीच्या भांड्यात तेल धूर येईपर्यंत गरम करा. नंतर तेल पूर्णतः थंड करून लोणच्याच्या बरणीत ओता आणि खाली-वर हलवा. महिनाभर लोणचं मुरायला ठेवून द्या. नंतर वापरायला काढा.