टोमॅटो एग करी (Tomato Egg Curry)

टोमॅटो एग करी (Tomato Egg Curry)

टोमॅटो एग करी

साहित्य : 1 उकडलेलं अंडं, 1 टीस्पून बडीशेप, 1 टीस्पून धणे, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून जिरं, 2 लाल मिरच्या, 2 टेबलस्पून तेल, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ.

कृती : कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात बडीशेप, धणे, जिरं आणि लाल मिरची घालून परता. मग ते थंड होऊ द्या. त्याच कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये कांदा आणि आलं-लसूण पेस्ट घालून परता. आता टोमॅटो घालून शिजू द्या. शिजल्यानंतर आचेवरून खाली घ्या. आता परतवलेलं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. हे वाटण पुन्हा कढईमध्ये घालून मसाल्याला तेल सुटेपर्यंत परता. नंतर आवश्यकतेनुसार पाणी, अंडं, हळद, गरम मसाला आणि मीठ घालून दाट होईपर्यंत उकळू द्या.