तीळ-मिरची ठसका (Till Mirchi Thaska)

तीळ-मिरची ठसका (Till Mirchi Thaska)

तीळ-मिरची ठसका


साहित्य : 1 वाटी तीळ, 8-10 संकेश्‍वरी मिरच्या, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून मेथी दाणे, अर्धा टीस्पून हळद, 4 टेबलस्पून तेल.
कृती : संकेश्‍वरी मिरच्या पाण्यात भिजवा. नंतर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात तीळ परतवून घ्या. त्यात मीठ एकत्र करून, हे मिश्रण मिरच्यांच्या वाटणात घाला आणि एकजीव मिश्रण तयार करा. आता उर्वरित 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, मेथी, व हळद यांची फोडणी करा आणि लगेचच मिरच्यांच्या मिश्रणावर घाला. हा तीळ-मिरचीचा ठसका तीन-चार दिवस चांगला टिकतो.