तीळ-लाल टोमॅटो चटका (Til Tomato Chataka)

तीळ-लाल टोमॅटो चटका (Til Tomato Chataka)

तीळ-लाल टोमॅटो चटका

 

साहित्य : 1 वाटी पांढरे तीळ, 5-6 काश्मिरी मिरच्या, 2 लाल टोमॅटो, 8-10 संकेश्‍वरी मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 3 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.

कृती : टोमॅटोमधील बिया काढून टाका आणि तो बारीक चिरून घ्या. एका लोखंडी तव्यावर तेल गरम करा आणि त्यावर लसूण आणि मिरच्या परतवून घ्या. नंतर त्यात तीळ घालून रंग बदलेपर्यंत परतवा. शेवटी त्यात टोमॅटो आणि मीठ घालून थोडं परतवा. मिश्रण थंड झाल्यावर पाणी न घालता जाडसर वाटून घ्या. हा चटका दोन-चार दिवस चांगला टिकतो.