तीळ-हिरवे टोमॅटो चटका (Til-Green Tomato Chataka)

तीळ-हिरवे टोमॅटो चटका (Til-Green Tomato Chataka)

तीळ-हिरवे टोमॅटो चटका

साहित्य : 1 वाटी पांढरे तीळ, 2 हिरवे कच्चे टोमॅटो, 8-10 संकेश्‍वरी मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.

कृती : टोमॅटो स्वच्छ धुऊन, लांबट चिरून घ्या. तव्यावर तेल गरम करून, त्यात मिरच्या, लसूण आणि तीळ लालसर रंगावर परतवून घ्या. आता टोमॅटो घालून मंद आचेवर भाजून घ्या. नंतर मिश्रण थंड करून मीठ घाला आणि बारीक वाटून घ्या.