तिल दाल मखनी (Til Dal Makkani)

तिल दाल मखनी (Til Dal Makkani)

तिल दाल मखनी

साहित्य : पाव वाटी चणे, पाव वाटी मूग, पाव वाटी उडीद, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी काळे तीळ, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी लसूण, पाव वाटी आलं, पाव वाटी मिरची, पाव वाटी कडिपत्ता, अर्धा वाटी तूप, स्वादानुसार मीठ.

कृती : सर्व डाळी एकत्र गरम पाण्यात स्वच्छ धुवा. एका कढईत भरपूर पाण्यात डाळी एकत्र शिजवून घ्या. डाळी शिजल्या की, घट्ट होईपर्यंत आटवा. दुसर्‍या कढईत तूप गरम करून, त्यात लसूण, कांदा, मिरची आणि कडिपत्ता परतवून घ्या. फोडणी खमंग झाली की, त्यात आलं आणि तीळ घाला. मिश्रण लगेच शिजवलेल्या डाळींवर ओता आणि मीठ घालून एक उकळी येऊ द्या. गरमागरम तिल मखना दाल नानसोबत सर्व्ह करा.