खजूर मार्बल (Thursday Special: Khajur Marble)

खजूर मार्बल (Thursday Special: Khajur Marble)

खजूर मार्बलसाहित्य :
250 ग्रॅम बारीक चिरलेले खजूर, 3-4 टीस्पून मध, 1 कप रवाळ वाटलेले शेंगदाणे, पाव कप भाजलेले मगज (खरबुजाच्या बिया), 2 टीस्पून तूप, स्वादानुसार वेलची पूड, 1 टीस्पून गुलकंद, पाव कप नारळाचा चव, चंदेरी वर्ख.

कृती : कढईमध्ये तेलावर खजूर परतवून घ्या. त्यात 2-3 टीस्पून पाणी एकत्र करा, म्हणजे खजूर नरम होतील. त्यात शेंगदाणे, मगज, गुलकंद आणि मध एकत्र करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. या मिश्रणाचे लांबट रोल तयार करून, त्यावर नारळाचा चव भुरभुरा आणि चांदीचा वर्ख लावा. या रोलच्या साधारण अर्धा इंच रुंदीच्या चकत्या करून सर्व्ह करा.