थालीपीठ (Thalipith)

थालीपीठ (Thalipith)

साहित्य : 2 वाटी वरई, 1 वाटी साबुदाणा पीठ, अर्धा वाटी किसलेला बटाटा, अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून जिरं, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व मिश्रण एकत्र करून, त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला आणि घट्ट कणीक मळून घ्या. ही कणीक तासभर ओल्या सुती कापडात गुंडाळून ठेवा. नंतर हाताला तेल लावून कणकेचे पातळ थालीपीठ थापून घ्या. गरम तव्यावर थोडं तेल सोडून मंद आचेवर थालीपीठ शेकून घ्या. गरमागरम थालीपीठ दह्यासोबत सर्व्ह करा.