तवा पनीर (Tava Paneer)

तवा पनीर (Tava Paneer)

तवा पनीर

साहित्य : अर्धा किलो पनीर, 1 वाटी गोड व घट्ट दही, 4 चमचे संकेश्‍वरी काश्मिरी मिरची ठेचा, स्वादानुसार सैंधव, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लिंबाचा रस, लोणी.

कृती :
पनीर कोमट पाण्यात एखादा मिनिट बुडवून ठेवा. नंतर पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे करा. दह्यामध्ये सैंधव, जिरेपूड, लिंबाचा रस आणि ठेचा एकत्र करा. पनीरच्या तुकड्यांना हा मसाला चोळून तासाभरासाठी तसेच ठेवून द्या. नंतर तव्यावर लोणी सोडून त्यावर मसाल्यासह पनीर घाला. मंद आचेवर पनीर मसाला परतवून घ्या. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर घाला.