टेस्टी स्वीट डिश : फ्रूट कस्टर्ड (Tasty Sweet D...
टेस्टी स्वीट डिश : फ्रूट कस्टर्ड (Tasty Sweet Dish: Fruit Custard)

By Shilpi Sharma in द्रौपदीची थाळी
घरी आलेल्या पाहुण्यांसाठी अगदी झटपट आणि सोपी स्वीट डिश बनवायची आहे, मग फ्रूट कस्टर्ड यासारखा उत्तम पर्याय असूच शकत नाही. फार वेळ लागत नाही, थंडच सर्व्ह करायचं असतं आणि अतिशय स्वादिष्ट बनतं.
फ्रूट कस्टर्ड
साहित्य :
१ लीटर दूध
२ टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर
१/३ कप साखर
दीड कप कापलेली मिक्स फळं
कृती :
थोड्या थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिसळून घ्या.
उरलेल्या दुधामध्ये साखर घालून उकळून घ्या.
एक उकळी आल्यानंतर त्यात कस्टर्ड पावडरचं मिश्रण घालून ढवळत राहा.
मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजू द्या.
थंड करा आणि त्यात कापलेली फळं घालून सर्व्ह करा.
टीप : आपल्या आवडीनुसार मोसमी फळांचा वापर केला तरी चालेल.