कोथिंबीर वडी (Tasty Snack : Kothimbir Vadi)

कोथिंबीर वडी (Tasty Snack : Kothimbir Vadi)

साहित्य : 1 मोठी जुडी कोथिंबीर, 2 वाटी बेसन, अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल मिरची पूड, 2 टीस्पून धणे पूड, 2 टीस्पून जिरे पूड, 1 टेबलस्पून तीळ, अर्धा टीस्पून साखर, 1 टीस्पून तेल, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : कोथिंबीर स्वच्छ करून, धुऊन, कोरडी करून घ्या. कोथिंबीर पूर्णतः कोरडी झाली की, बारीक चिरून घ्या. नंतर त्यात हळद, लाल मिरची पूड, मीठ, धणे-जिरे पूड, साखर, मीठ आणि तीळ व्यवस्थित एकत्र करा. हे मिश्रण साधारण पंधरा मिनिटं झाकून ठेवा. मिश्रण थोडं ओलसर होईल. नंतर मिश्रणात मावेल इतकं बेसन त्यात घाला. आवश्यकता असल्यास थोडं पाणी घालून साधारण भाकरीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट पीठ भिजवा. पिठाला 1 टीस्पून तेलाचा हात लावून, रोल करून घ्या. हे रोल चाळणीवर ठेवून कुकरमध्ये शिटी न लावता वाफवून घ्या. साधारण 20 मिनिटात रोल शिजतील. नंतर कुकरबाहेर काढून थंड होऊ द्या. रोल साधारण थंड झाले की, त्याच्या वड्या पाडा. आता या वड्या आवडीनुसार गरम तेलात तळा किंवा शॅलो फ्राय करून घ्या. कोथिंबिरीच्या वड्यांना अळूवडीप्रमाणे राईची फोडणीही देता येईल.
कोथिंबीर वडी, Tasty Snack, Kothimbir Vadi

कॅबेज चीझ ब्रेड स्टिक्स (Different Cabbage Recipe)