फिरनी (Tasty Phirani)

फिरनी (Tasty Phirani)

फिरनी

साहित्य : 4 वाट्या दूध, अर्धा वाटी तांदूळ, पाऊण वाटी साखर, पाव वाटी बदाम-पिस्त्याचे काप, 2 थेंब केवडा इसेन्स किंवा पाव चमचा केशर, 3-4 हिरव्या वेलच्या.
कृती : तांदूळ दोन तास भिजत ठेवा. नंतर पाणी निथळून बारीक वाटा. दूध गरम करून उकळी आल्यावर त्यात वाटलेले तांदूळ घाला. त्याबरोबर साखर आणि वेलचीही घाला. मंद आचेवर मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की, आचेवरून उतरवून त्यात सुकामेवा घाला. मिश्रण पूर्ण थंड करून खायला द्या.
– विष्णू मनोहर