कोकनट सूप (Tasty Coconut Soup)
कोकनट सूप (Tasty Coconut Soup)

कोकनट सूप
साहित्य : 2 वाट्या ओलं खोबरं, 1 वाटी चिरलेला कांदा, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे चिंचेचा कोळ, 1 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरेपूूड- मिरीपूड, कढीपत्ता, लोणी, चवीनुसार मीठ.
कृती : ओल्या खोबर्याचं दूध काढा. त्यात चिंचेचा कोळ घालून उकळत ठेवा. एका कढईत लोणी आणि एक चमचा तेल गरम करा. त्यावर मिरच्या आणि कांदे लालसर परतवा. त्यात जिरंपूड, मिरपूड, कढीपत्ता घालून फोडणी करा. आता हे लोण्याचं मिश्रण सुपवर ओता. उकळी येण्याच्या आत गॅस बंद करा. कोकनट सूप कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.