चिंच सरबत (Tamarind Sarbat)

चिंच सरबत (Tamarind Sarbat)

साहित्य : पाव किलो चिंच, अर्धा किलो साखर.
कृती : स्वच्छ, पिकलेली आणि चांगल्या दर्जाची चिंच घेऊन अर्धा लीटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर चिंच हाताने स्मॅश करून त्याच पाण्यासोबत गाळणीतून गाळून घ्या. हे मिश्रण एका पॅनमध्ये घेऊन, त्यात साखर घालून गॅसवर उकळण्यासाठी ठेवा. मिश्रणाचा दोन तारी पाक तयार झाल्यानंतर, आच बंद करून मिश्रण थंड करा. नंतर गाळून स्वच्छ हवाबंद काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. हे सरबत 25 ते 50 ग्रॅमपर्यंत सेवन करू शकता.
लाभ :
-रात्रीच्या वेळी हे सरबत घेतल्यास सकाळी शौचाला साफ होतं.
-उन्हाळ्यामध्ये सकाळी सरबत घेतल्यास, दिवसभर ऊन लागण्याची भीती राहत नाही.