तांदळाची खीर (Sweet Rice Kheer)

तांदळाची खीर (Sweet Rice Kheer)

तांदळाची खीर, Sweet Rice Kheer
साहित्य : अर्धा कप आंबेमोहर तांदूळ, 1 कप खोबरं, 100 ग्रॅम गूळ, 4 कप दूध, 1 टीस्पून वेलची पूड.
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन तासभर भिजत ठेवा. नंतर निथळून बाजूला ठेवून द्या. आता जाड बुडाच्या भांड्यात मध्यम आचेवर दूध गरम करत ठेवा. दूध उकळू लागल्यानंतर त्यात गूळ, खोबरं आणि वेलची पूड मिसळा. नंतर तांदूळ घालून चांगलं एकजीव करा. आच अगदी मंद करून तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्या. तांदूळ शिजून खीर दाट झाली की, आच बंद करा. तांदळाची खीर गरमागरम सर्व्ह करा.
टीप :
–    स्वादानुसार गुळाचं प्रमाण कमी-जास्त करता येईल.
–    तसंच यात तुपावर परतवून काजू, बदाम, मनुकाही घालता येईल.

पनीर मालपोहा (Special Sweet Paneer Recipe)