रताळ्यांचा हलवा (Sweet Pota...

रताळ्यांचा हलवा (Sweet Potato Halwa)

रताळ्यांचा हलवा

साहित्य : 1 कप उकडून कुस्करलेली रताळी, अर्धा कप साखर, अर्धा टीस्पून वेलची पूड, 2 टेबलस्पून तूप, 2 टेबलस्पून बारीक केलेले काजू, 2 टेबलस्पून मनुका, सजावटीसाठी चांदीचा वर्ख.

कृती :
एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात रताळ्याचा गर घालून साधारण परतवा. त्यात साखर आणि वेलची पूड घालून मंद आचेवर 20 मिनिटं परतवा. नंतर काजू आणि मनुका घालून एकत्र करा. वरून चांदीचा वर्ख लावून रताळ्याचा गरमागरम हलवा सर्व्ह करा.