कैरीचं गोड लोणचं (Sweet Pickle Of Raw Mango)

कैरीचं गोड लोणचं (Sweet Pickle Of Raw Mango)

कैरीचं गोड लोणचं

साहित्य : 1 किलो आंबट कैरी, 100 ग्रॅम मोहरी डाळ, 50 ग्रॅम धणे, 25 ग्रॅम मेथी दाणे, अर्धा किलो किसलेला गूळ, स्वादानुसार मीठ, 2 टेबलस्पून लाल मिरची पूड, स्वादानुसार लवंग-दालचिनी-जायफळ पूड, हिंगाचा खडा, तिळाचे तेल.

कृती : कैरी स्वच्छ धुऊन पुसून घ्या. कैरीच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. धणे आणि मेथीदाणे जाडसर भरडून घ्या. मोहरी डाळ, धणे-मेथीची पूड कोरडी भाजून घ्या. हिंगाची पूड करा. आता एका मोठ्या परातीमध्ये मिरची पूड, हिंग आणि सर्व मसाले एकत्र करा. त्यावर थोडं गरम तेल ओतून मिसळा. त्यात किसलेला गूळ आणि मीठ घालून एकजीव करा. आता त्यात कैरीच्या फोडी घालून कालवा. हे कैरीचं मिश्रण स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरा. त्यावर तेलाचं कडक मोहन घाला आणि झाकण लावून ठेवा. साधारण चार-पाच दिवसांनी लोणचं खायला घ्या. लोणचं अधूनमधून ढवळत राहा.