शेंगदाण्याची वडी (Sweet Peanut Delite)

शेंगदाण्याची वडी (Sweet Peanut Delite)

शेंगदाण्याची वडी


साहित्य :  2 कप भाजून रवाळ वाटलेले शेंगदाणे, 1 कप साखर, 1 टीस्पून तूप, थोडा चंदेरी वर्ख.
कृती : एका पॅनमध्ये साखर आणि तेवढंच पाणी घालून, हे मिश्रण गरम करत ठेवा. त्याचा दीड तारी पाक तयार करून घ्या. त्यात शेंगदाण्याची पूड घालून एकजीव करा. एका ताटाला किंवा ट्रेला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण घाला आणि सारखं करून घ्या. साधारण तास-दोन तासानंतर त्याच्या वड्या पाडा. शेंगदाण्याच्या वडीवर चंदेरी वर्ख लावून सर्व्ह करा.