खोबर्‍याच्या साटोर्‍या (Swe...

खोबर्‍याच्या साटोर्‍या (Sweet Dry Coconut Puri)

खोबर्‍याच्या साटोर्‍या

साहित्य : 4 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी साखर, अर्धा वाटी किसलेला गूळ, 1 वाटी ओल्या खोबर्‍याचा चव, 4 टीस्पून तूप, तळण्यासाठी तूप, 1 टीस्पून वेलची पूड.
कृती : साडेतीन वाट्या पाण्यात गूळ आणि थोडं तेल घालून पाणी उकळवा. पाणी उकळलं की, त्यात थोडं-थोडं करून गव्हाचं पीठ मिसळा आणि चांगलं एकजीव करा. त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढा.
एका वाडग्यात साखर आणि खोबरं चांगलं एकजीव करा. आता गव्हाच्या पिठाचे लहान गोळे करा. त्याची वाटी तयार करून त्यात सारण भरा आणि लाट्या तयार करा. या लाट्यांचे पुरीएवढ्या आकाराचे पराठे लाटा. या साटोर्‍या गरम तुपात सोनेरी रंगावर तळून घ्या.